आंतरजातीय विवाह केल्यास २.५० लाख रु. मिळणार : Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra : राज्य सरकारने जातीभेद दूर करण्यासाठी तसेच आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमार्फत आंतरजातीय विवाह करणार असलेल्या जोडप्यांना २.५ लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे. आंतरजातीय विवाह योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या पोस्टच्या मार्फत जाणून घेणार आहोत. तरी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा.

या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील जर कोणत्या जोडप्यांचा आंतरजातीय विवाह होणार असेल आणि जर त्या जोडप्यामध्ये एक अनुसूचित जाती म्हणजेच दलित समाजातील आहे, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २.५० लाख रुपये रक्कम मिळणार आहे.

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra 2024 :

तर मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही आंतरजातीय विवाह योजनेची पूर्ण माहिती दिलेली आहे. ही माहिती तुम्ही शेवट पर्यंत वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या. त्याचबरोबर तुमच्या परिसरामध्ये कोणी आंतरजातीय विवाह केला असेल तर त्यांना ही पोस्ट शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की, महाराष्ट्र राज्यातील जातीमध्ये असलेला भेदभाव नष्ट करणे आणि आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे.

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra Marathi

महाराष्ट्र राज्यातील सामान्य कुटुंबातील मुलाने अथवा मुलीने अनुसूचित जाती मधील मुलाशी किंवा मुलीशी लग्न केले तर, त्यांना या योजनेमार्फत राज्य सरकारद्वारे भक्कम राशी मिळणार आहे. फक्त महाराष्ट्रामधील ज्या जोडप्यांनी हिंदू विवाह कायदा १९५५ अथवा विशेष विवाह कायदा १९५४ या कायद्या अंतर्गत आपल्या विवाहाची नोंदणी केली आहे, अशा जोडप्यांनाच या योजनेचा फायदा होईल. या योजनेसाठी देण्यात येणार निधी केंद्र आणि राज्य सरकार Maharashtra Inter-Caste Marriage Scheme 2024 या स्कीम नुसार देण्यात येईल. ही निधी राज्य व केंद्र सरकारकडून ५०-५०% देण्यात येईल.

योजेनचे नावAntarjatiya Vivah Yojana Maharashtra
कोणाद्वारे सुरु करण्यात आलीमहाराष्ट्र सरकार
योजेचा उद्देशआंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन देणे
लाभ२.५० लाखांपर्यंत आर्थिक मदत
लाभार्थीआंतरजातीय विवाह करणारे अनुसूचित जातीमधील नागरिक
विभागसामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटambedkarfoundation.nic.in

आंतरजातीय विवाह योजनेची वैशिष्ट्ये व लाभ :

  • Antarjatiya Vivah Yojana Maharashtra या योजने अंतर्गत डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या मार्फत २.५० लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे.
  • जाती धर्मामध्ये भेदभाव कमी करणे आणि सर्व धर्मामध्ये समानतेची भावना निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक दृष्टीने विकास करणे.
  • समाजामध्ये इतर धर्मांबद्दल असणारा गैरसमज व भेदभाव नष्ट करणे.
  • या योजने अंतर्गत दिली जाणारी रक्कम ही थेट लाभार्त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात येईल. यासाठी जे पण लोक या योजनेचा फायदा घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांचे बँकेत खाते असावे आणि ते आधार कार्ड सोबत लिंक केलेले असावे.
  • जास्तीत जास्त लोकांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेता यावा. म्हणून या योजनेसाठी कोणतीही वार्षिक उत्पन्न मर्यादा देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजनेसाठी पात्रता :

  • अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
  • आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीची आणि मुलाचे वय हे १८ वर्षे आणि २१ वर्षांपेक्षा कमी नसले पाहिजे.
  • Antarjatiya Vivah Yojana Maharashtra यासाठी विवाहित मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एकाने अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमधील असणे बंधनकारक आहे.
  • तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाहित जोडप्यांना कोर्ट मॅरेज करणे अनिवार्य आहे.

आंतरजातीय विवाह योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईझ फोटो
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • बँक खाते
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • लग्नाचा फोटो
  • जातीचा दाखला
  • न्यायालयीन विवाह प्रमाणपत्र
  • विवाह नोंदणीचा दाखला
  • वधूचा व वरचा जातीचा दाखला
  • वधूचा व वरचाशाळा सोडलेचा दाखला
  • २ प्रतिष्ठित व्याव्क्तीचें शिफारस पत्र
  • वधू आणि वराचा एकत्रित बँक खाते पासबुक झेरॉक्स

सरकारच्या इतर योजना

आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कार्याची पद्धत :

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या भागातील जिल्हा कार्यालयामध्ये सामाजिक न्याय व विशेष साहाय्य या विभागामध्ये जायचे आहे.
  • त्यानंतर तिथल्या अधिकाऱ्याकडून आंतरजातीय विवाह योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्ज घेतल्यानंतर तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि नंतर विचारलेली संपूर्ण माहिती त्यामध्ये भरायची आहे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करायचा आहे.
  • अर्ज जमा केल्यानंतर अर्जाची पोच पावती घ्यायची आहे.
  • अशा पद्धतीने ऑफलाईन रित्या तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

आंतरजातीय विवाह योजने संबंधित विचारले जाणारे काही प्रश्न :

आंतरजातीय विवाह म्हणजे काय?

आंतरजातीय विवाह म्हणजे दोन वेग-वेगळ्या जातींच्या व्यक्तींमधील विवाह होय. २०१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वे नुसार भारतातील फक्त ५% विवाह हे आंतरजातीय केले जातात.

आंतरजातीय विवाहासाठी सरकार किती पैसे देते?

आंतरजातीय विवाह योजनेमध्ये लाभार्थ्याला ३ लाख रुपयांपर्यंत सरकार तर्फे मदत मिळते, त्यापैकी सरकारतर्फे ५०,०००/- रु. आणि डॉ. आंबेडकर फाऊंडेशन मार्फत २.५० लाख रु. दिले जातात.

आंतरजातीय विवाहासाठी मला अडीच लाख कसे मिळतील?

आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून २.५० लाख रुपयांची रक्कम NEFT/ RTGS च्या मार्फत जोडप्यांच्या जॉईंट खात्यामध्ये जमा केली जाते. यासाठी वर किंवा वधू या दोघांपैकी एक या योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे.

1 thought on “आंतरजातीय विवाह केल्यास २.५० लाख रु. मिळणार : Antarjatiya Vivah Yojana Maharashtra”

Leave a comment